
अमळनेर(प्रतिनिधी):- अमळनेर विधानसभा मतदारसंघातील बीएलओ यांची बैठक पालिकेच्या सभागृहात १३ मे रोजी पार पडली.यावेळी निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीत मयत मतदार,दुबार मतदार, स्थलांतरित, विवाह होऊन बाहेरगावी कायम स्वरुपी स्थलांतरित झालेले मतदार यांचे नाव कमी करणे तसेच विवाह होऊन तालुक्यात स्थायिक झालेल्या महिला मतदार,नवमतदार यांची नावे समाविष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सोबतच मतदारांच्या रहिवास पत्ता तसेच इतर तपशील दुरुस्त करणे,मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडणी करणे याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या.





