
अमळनेर :- शहरातील सदगुरू नगर,शास्त्री नगर व शेजारील भागात झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्या भागातील महिला तसेच नागरिकांनी पालिका प्रशासनाला निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

शहरातील ढेकु रस्त्यावरील सद्गुरू नगर,शास्त्री नगर तसेच शेजारील भागात रस्त्यांचे खोदकाम करून ठेवलेलं आहे,तसेच पाणीपुरवठा योजनेच्या खोदकामामुळे देखील रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे.रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अबालवृद्ध,महिला तसेच नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अवकाळी पावसानेच रस्त्यांची अशी अवस्था असेल तर ऐन पावसाळ्यात या रस्त्याने चालणे देखील अवघड होणार आहे त्यामुळे पालिकेने वेळीच दखल घेऊन खराब झालेल्या रस्त्यावर पावसाळ्यापूर्वी मुरुम टाकून रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ढेकु रोड,पिंपळे रोड या भागातून पालिकेला कराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते,मात्र पाहिजे त्या पायाभूत सुविधा पालिकेकडून अजूनही पुरविल्या गेल्या नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
निवेदनावर हर्षा देशमुख,पूनम पवार,मंगला सोनवणे,मनिषा पाटील, ज्ञानेश्वरी पवार,अलका पाटील, सुनंदा पारधी,सुशीला पारधी,पूनम साळुंके,संगीता साळुंके,संध्या साळुंके,मीना धनगर,सुनंदा सोनवणे,मीनाक्षी वेलसे,कांचन पाटील,योगिता पाटील,दिपाली बोरसे,दीक्षा ठाकरे,दिशा चव्हाण,मनिषा सुरते,कुरक्षा सुरते,सरला पाटील,वैशाली वारुळे, कृष्णा पवार,प्रियंका पवार,हिराबाई पारधी,नेत्रा पाटील,गायत्री पाटील,श्रद्धा साळुंखे,मंदाकिनी पाटील, सुवर्णा पाटील,राजश्री देशमुख,शीतल निकुंभ,सपना पांडव,हेमलता पाटील,कुसुम पांडव,वनमाला सैंदाणे यासह त्या भागातील महिलांच्या व नागरिकांच्या सह्या आहेत.




