
स्नेह मेळाव्यात जुन्या आठवणीत रमले सवंगडी…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील द्रो.फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयातील सन २०१०-११ साली बारावीच्या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल १५ वर्षानंतर एकत्र आले. ११ रोजी त्यांचा स्नेह संमेलनाच्या कार्यक्रम उत्साहात पार पाडला. यावेळी जुन्या मित्रांनी एकत्र येऊन संवाद साधत कॉलेज जीवनातल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी विद्यार्थ्यांनी परिचय देऊन जुन्या आठवणींना उजाळा देत मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे मयत विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच पहलगाम येथील हल्ल्यात मृत झालेल्या भारतीय नागरिक सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेतील यशस्वी सोबत्यांचा सत्कार करण्यात आला. बोहरा रस्त्यावरील वाहुठे मारुती मंदिरावर स्नेह भोजनाचा कार्यक्रम पार पडला.

सदर कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी दीपक पाटील, प्रशांत बागल, आशा पाटील, सुवर्णा पाटील, हर्षदा पाटील, योगिता बिऱ्हाडे, कोमल पाटील, प्रियांका पाटील, सरला सपकाळे, कीर्ती बडगुजर, दामिनी गोसावी, अजय वानखेडे, मुन्ना पाटील, प्रवीण शिंदे, योगेश साळुंखे, रवींद्र वानखेडे, योगेश शिंदे, मनोहर पाटील, नितीन सोनवणे, निलेश पाटील, महेश कोळी, योगेश पाटील आदींनी परिश्रम घेतले. अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सर्वजण भावूक झाले होते.





