
अनेक ठिकाणी रस्त्यावर साचले पाणी,यात्रोत्सवात व्यावसायिकांचे प्रचंड हाल
अमळनेर-शहर व परिसरात काल सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होऊन अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते,यात्रोत्सवात व्यावसायिकांचे प्रचंड हाल झालेत.

काल दिवसभर प्रचंड उकाडा होत असताना सायंकाळी 5.30 वाजता अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली,जोरदार पडत असलेल्या पावसामुळे मान्सून सक्रिय झाल्याचा भास यानिमित्ताने होत होता,शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले होते.

विशेष करून बोरी नदी पात्रात यात्रोत्सव सुरू असल्याने या जोरदार पावसामुळे व्यावसायिकांची मोठी धांदल उडून काहिंचे नुकसान देखील झाले.यावर्षी अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असल्याची भावना दुकानदारांनी व्यक्त केली. पावसामुळे बाजारात देखील व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती.




