
शहरातील पाच कंदील भागात छापा टाकून तिघांना केली अटक
अमळनेर : चोरून गांजाचे झुरके मारणे तिघांना महाग पडले असून पोलिसांनी शहरातील पाच कंदील भागात छापा टाकून तिघांना अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना १५ रोजी गोपनीय माहिती मिळाली की गांधलीपुरा भागात पाच कंदील चौकात काही तरुण गांजा सेवन करीत असल्याची माहिती मिळाली. पो नि निकम यांनी हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील ,गणेश पाटील ,जितेंद्र निकुंभे , अमोल पाटील यांना छापा टाकण्यास सांगितले.

सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास पाचकंदील चौकात पोलिसांनी छापा टाकला असता एका भिंतिच्या आड शंकर सुपडू ढाल वाले वय ३२ रा नगरपालिकेच्या दवाखान्यात मागे ,तसेच दुसरा जयसिंग बारकू पारधी वय ६० रा ताडेपुरा , हितेश सुरेश पाटील वय २७ रा. जवखेडा हल्ली मुक्काम तांबेपुरा हे तिघे गांजा सेवन करताना आढळून आले. त्यांना अटक करून त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क) , २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





