
कार्याध्यक्षपदी जयविरसिंग राजपुत, अमळनेरात जयंतीनिमित्त होणार विविध कार्यक्रम
अमळनेर-येथील राजपूत एकता मंचची बैठक नुकतीच पार पडून यावेळी श्री महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी स्वर्णदीप मानसिंग राजपूत तर कार्याध्यक्षपदी जयविरसिंग राजपुत यांची निवड करण्यात आली.

अमळनेर तालुका राजपूत एकता मंचतर्फे दिनांक 29 मे रोजी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.यासंदर्भात बैठकीत चर्चा होऊन समिती गठीत करण्यात आली.सदर समितीत उपाध्यक्षपदी योगेश राजपूत(ढेकू),हर्षल नरेंद्रसिंह ठाकूर (अमळनेर), सचिव- केदारसिंग जाधव,खजिनदार- मुकेश परदेशी, सह खजिनदार- सोमेश राजपूत,सदस्य ओंकार राजपूत,योगेश राजपूत,अभिषेक भोसले.यासह इतर युवा कार्यकर्त्याचा समितीत समावेश करण्यात आला.

यावेळी समाजसेवक प्रा धर्मसिंह पाटील यांनी मार्गदर्शन केले.तसेच जयंतीदिनीच गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थी आणि पालक हितासाठी व्याख्यान आयोजित करण्याबाबत नियोजन करण्यात आले.तरी 10 वि व 12 वित 65 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या समाजातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले मार्कशीट स्वर्णदीप राजपूत,प्रफुल्ल कोंमर्स एकेडमी, हशीमजी प्रेमजी कॉम्प्लेक्स,8888917651 व सोमेश राजपूत महाराणा कोचिंग क्लासेस 8308303938 अमळनेर येथे जमा करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.




