
तर उपसरपंच पती विरुद्ध जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा…
अमळनेर : तालुक्यातील शिरूड येथे विकास कामांच्या बाबतीत टीका करणाऱ्या दोन तरुणांनी अश्लील वक्तव्य करून उपसरपंचाचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपसरपंचांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की , पंकज भगवान पाटील व सागर प्रल्हाद पाटील हे नेहमी ग्रामपंचायतीच्या विकास कामाबाबत तक्रार करतात , हरकती घेतात , आरोप प्रत्यारोप करून सोशल मीडियावर संदेश टाकतात. ७ रोजी पंकज ने पाठलाग करून अश्लील वक्तव्य केले आणि सागर नेहमी बदनामी करतो अशी तक्रार दिल्याने दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४,७९ ,३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.

दरम्यान ४ रोजी उपसरपंच पती प्रफुल पंडित पाटील उर्फ मुन्ना याने व्हाट्सप वर प्रतिक्रिया दिली म्हणून पंकज भगवान पाटील यांची आई मीराबाई हिला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली तसेच पंकज याला देखील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून अमळनेर पोलिसात ३५१(२),३५२,३५५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




