
अमळनेर- येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात श्वानांची रेबीज लसीकरण मोहीम आज दिनांक 21 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.
.

पशुसंवर्धन दिनाचे निमित्ताने पशु वैद्यकीय दवाखाना अमळनेर येथे आज बुधवार रोजी स.10 ते सायं. 4 पर्यंत श्वानांचे रेबीज लसीकरण मोहीम चे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर लसीकरण मोहिमेत जास्तीत जास्त श्वानांचे लसीकरण व्हावे व शहरातील रेबीज चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने पालिकेच्या मुख्याधिकारीनाही पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, अमळनेर यांनी पत्र दिले आहे.





