
आरोपीची सखोल चौकशी करून कठोर कारवाईची केली मागणी
अमळनेर : चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ व आरोपीची सखोल चौकशी करून कठोर कारवाईच्या मागणीसाठी विविध संघटना व भाजप तर्फे वेगवेगळे निवेदन देण्यात आले.

अमळनेरातील रउफ बँडचा मालक असलम अली (वय २९ रा सराफ बाजार अमळनेर) याच्यावर चोपडा तालुक्यातील मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे पडसाद तालुक्यात उमटले असून संतप्त नागरिकांनी रउफ बँडच्या गाडीवर कारवाई करून बहिष्काराचे आवाहन देखील करण्यात आले होते.

यासंदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. जमावाचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बँड पथकाची गाडी जमा करण्याची मागणी करण्यात आली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना निवेदन देताना भाजप अमळनेर मंडळ अध्यक्ष योगेश महाजन, जानवे मंडळ अध्यक्ष जिजाबराव पाटील , पातोंडा मंडळ अध्यक्ष राहुल पाटील , श्याम पाटील , शिंदे सेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील , माजी नगरसेवक विक्रांत पाटील , संजय पाटील , देवा लांडगे , अक्षय चव्हाण , दर्पण वाघ , मनोज शिंगाणे , अनिरुद्ध शिसोदे , शुभम पवार , अक्षय पाटील , उज्वल मोरे , विठ्ठल पाटील , प्रेम पाटील ,देव गोसावी , संतोष पाटील , संजय पाटील आदी कार्यकर्ते हजर होते.
त्याचप्रमाणे सायंकाळी पुन्हा बजरंग दल , विश्वहिंदू परिषद , आणि भाजप पदाधिकारीनी पोलीस स्टेशनला मोर्चा काढला. सकाळी हजर असलेले काही कार्यकर्ते देखील सामील झाले. चोपड्यात घडलेला प्रकार लव जिहाद चा असून जिहादी वृत्ती रोखण्यासाठी गोपनीय शाखेमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी. तसेच यात काही मुली अजून अडकल्या असतील तर त्यांची सुटका करावी. आरोपीच्या मित्रांचे व इतरांचे सहकार्य असेल तर त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी केली.
यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी बँड चे वाहन बेकायदेशीर असेल किंवा नियमबाह्य बदल केले असतील तर त्यांच्यावर आरटीओ ने कारवाई करावी यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल असे आश्वासन दिले.

