दहिवद येथील घटना, ११ जणांवर दंगलीचा व ॲट्रोसिटीचा गुन्हा…
अमळनेर:- तालुक्यातील दहिवद येथे महादेव मंदिराजवळ पोळा सण साजरा करीत असताना सरपंचाला जातीवाचक शिविगाळ करून मारहाण झाल्याच्या तक्रारीवरून ११ जणांवर दंगलीचा व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील दहिवद येथे दिनांक १४ रोजी दुपारी ४ वाजता पोळा सण साजरा करण्यासाठी बैलजोड्या आणण्यात आल्या होत्या. तेथे डीजेवर काही जण नाचत असताना सरपंच देवानंद कपूरचंद बहारे यांनी व्यवस्थित नाचा असे सांगितले. त्यावेळी ज्याला रोजगार सेवक म्हणून ग्रामपंचायतीत घेतले नाही त्याच्यासह अकरा जणांनी त्यांना मारहाण केली. एकाने डोक्यात सळईने मारहाण केली तर एकाने हॉकी स्टिकने मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार बहारे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातून केल्याने अकरा जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर करीत आहेत.