
अमळनेर :- तालुक्यातील क्रीडा संकुलातील नवीन बहुउद्देशीय हॉल, जुना बहुउद्देशीय हॉल आणि ४०० मीटर धावण्याच्या ट्रॅक चे लोकार्पण २९ रोजी सकाळी ११ वाजता पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन , सहकार मंत्री बाबासाहेब पाटील ,क्रीडा युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे ,खासदार स्मिता वाघ , माजी मंत्री आमदार अनिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने १० कोटी ६६ लाख ९८ हजार रुपयांची सुधारीत मान्यता मिळाली होती. त्यापैकी ३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून १ कोटी ५० लाख रुपये खर्चून ४०० मीटर धावन मार्ग नूतनीकरण , जुना बहुउद्देशीय हॉल दुरुस्ती आणि नूतनीकरण तसेच बास्केट बॉल , व्हॉलीबॉल , स्केटिंग मैदान , तर १ कोटी रुपयातून कुस्ती ,ज्युडो ,कबड्डी या खेळांच्या सरावाकरिता नवीन हॉल निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण २९ रोजी होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक , तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी केले आहे.

बाजार समितीत विकास कामांचा शुभारंभ
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकार मंत्र्यासह इतर मंत्री महोदय व मान्यवारांच्या उपस्थितीत शतकपूर्ती दशक समारंभा निमित्त विविध विकास कामांचा पायाभरणी समारंभ होणार आहे.सदर कार्यक्रम बाजार समितीत दुपारी १२:३० वाजता होणार असून कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील व संचालक मंडळाने केले आहे.




