
अमळनेर:- तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अमळनेर तालुक्यात रब्बी हंगामाला मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईबाबत पंचनाम्याची प्रतीक्षा असतांना गेल्या दोन दिवसात झालेला दमदार पाऊस काही शेतकऱ्यांना मात्र फायदेशीर ठरला असून शेतीची मशागत पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांकडून कपाशी लागवडीला सुरूवात देखील झाली आहे. परंतु मजूर मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांची मक्का व बाजरी, ज्वारी ही शेतातच पडून आहे. वेळेवरती मका काढण्याची मशीन व व मक्का कुट्टी करण्याचे मशीन मजुरा अभावी मिळत नसल्याकारणाने शेतकरी राजा हा चिंतेत आहे.

शेतकरी मान्सूनपूर्व कपाशी लागवड करतात. आताही तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या दमदार अवकाळी पावसाच्या भरवशावर शेतकरी कपाशी लागवड करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतीची मशागत पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायद्याचे ठरत असल्याचे दिसून येत असून या पावसामुळे जमिनीत चांगलीच ओल झाल्याने ठिबक सिंचनाची सोय असलेले शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करीत आहे. तर काही शेतकरी शेतात रोटर व नांगरटी करून तात्काळ ठिबक नळ्या अंथरून तयारी करीत आहेत.

पावसामुळे शेतकरी राजाची तारांबळ उडाली असून मशागतीचे कामांनाही ब्रेक लागला आहे. ज्या शेतकऱ्यांचे स्वतःचे ट्रॅक्टर स्वतःचे घराची मजूर आहेत त्या शेतकऱ्यांची शेती तयार आहे. मात्र यंदा मे च्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाने तालुक्यात ठाण मांडल्याने रब्बी हंगामाच्या पीके काढणीला ब्रेक बसला.




