
मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याची ग्रामस्थांची तक्रार
अमळनेर : तालुक्यातील जानवे येथे अंगणवाडीच्या परिसरात व शॉपिंग सेंटर लगतच गुरे बांधली जात असल्याने मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याची तक्रार जानवे येथील शरद साहेबराब पाटील यांनी केली आहे.

ग्रामपंचायत मालकीच्या इमारतीलगत गुरे बांधली जात असल्याने आरोग्यावर परिणाम होऊन इमारत देखील खराब होत आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे शरद पाटील यांनी म्हटले आहे.

याबाबत ग्रामसेवक हितेंद्र कोतवाल यांनी म्हटले आहे की संबंधित गुरे बांधणाऱ्या लोकांना नोटिसा दिल्या असून त्यांनी यापुढे गुरे बांधणार नाही असे लेखी दिले आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक जागी गुरे बांधणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.




