
पर्यावरण दिनानिमित्त साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान सुरू करणार प्लास्टिक बंदीची मोहीम
अमळनेर-आज 5 जून पर्यावरण दिनानिमित्त भाजी विक्रेत्यांना साडीपासून शिवलेल्या कापडी पिशव्या भेट देऊन प्लास्टिक पिशव्या स्वयंशिस्तीने बंद करण्याच्या मोहिमेस प्रारंभ करण्यात येणार आहे.पर्यावरण दिनानिमित्त साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

सदर मोहिमेसाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान च्या कामातील कृतीशील सहकारी , पाठीराखे , हितचिंतक , व अमलनेर शहरातील सर्व संवेदनशील लहानथोर यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की मानवतेसह निसर्ग समृद्धीच्या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण मित्र होऊया.या अंतर्गत प्लास्टिक पिशव्या ऐवजी कापडी पिशवी आठवणीने वापरात आणण्याचा संदेश देण्यात येणार आहे.आज सकाळी 11 वाजता भाजी बाजारात साने गुरुजी स्मारकाच्या वतीने जुन्या साडी पासून शिवलेल्या कापडी पिशव्या प्रातिनिधिक स्वरूपात भाजी विक्रेते यांना भेट देऊन प्लास्टिक पिशव्या स्वयंशिस्त ने बंद करण्याची मोहीम सुरु करण्यात येणार आहे.तरी सदर उपक्रमात सहभागी व्हावे आणि पर्यावरण मित्र होण्यासाठी 8999214021 यावर संपर्क साधावा.

संवेदनशील नागरिक पर्यावरण प्रेमी म्हणून आपण पुर्वी दुध घ्यायला भांडे डबा वैगरे घेऊन जात आता प्रत्येक व्यक्ती दुधासोबत प्लास्टिक पिशवी घरी आणतो,मटण घ्यायला जातांना घरून डबा घेऊन जाऊ शकतो,हाॅटेल मध्ये भाजी पार्सल आणतांना डबा नेऊ शकतो,भाजीपाला घ्यायला जातांना कापडी पिशव्या सोबत नेऊ शकतो तरी हा बदल स्वयंशिस्त व जाणिवेतून व्हावा अशी अपेक्षा करत संपूर्ण वर्षभरात पर्यावरण संदर्भात विविध उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग नोंदवण्यासाठी पर्यावरण मित्र व्हा आणि जोडून घ्या साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान च्या पर्यावरण प्रेमी मित्र ग्रुपला 9075570510 असे आवाहन करण्यात आले आहे.




