
अमळनेर :- महावितरण कंपनीचा 20 वा वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताह दि.1 ते 6 जून पर्यंत साजरा करण्याच्या सूचना महावितरण मुख्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.त्यानुसार अमळनेर उपविभाग 1 व 2 तर्फे दि.3 जून रोजी अमळनेर शहरात विद्युत सुरक्षा रॅली काढून जनजागृती करण्यात आली.यात वीज बचतीविषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

मंगळ ग्रह मंदिरावर आलेल्या भाविकांना देखील वीज सुरक्षा बाबत माहिती देण्यात आली.तसेच अनधिकृत पणे आकडे टाकून वीज चोरी न करता अधिकृतपणे वीज मीटर घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.

यावेळी धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश सोनगिरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता टी एच नेमाडे,उप कार्यकारी अभियंता प्रफुल्ल पाटील,अमळनेर उपविभाग 1 व 2 उपविभागातील सर्व सहायक अभियंता,सर्व तांत्रिक कर्मचारी तसेच लेखा व आस्थापना विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.




