
अमळनेर (प्रतिनिधी):- शहरातील नर्मदा रिसॉर्टच्या बाहेरून २५ हजार किमतीची मोटारसायकल होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल चोरीला गेली असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मराठे गल्ली भागातील रहिवाशी सुनील पाटील हे ४ रोजी रात्री ८ वाजता गलवाडे रस्त्यावरील नर्मदा रिसॉर्ट येथे लग्नाला भेट देण्यासाठी त्यांच्या मोटारसायकल क्रमांक (एम एच १९ डी एल ३८२४) ने गेले होते.त्यांनी त्यांची मोटारसायकल रिसॉर्ट च्या बाहेर लावलेली होती.लग्नकार्य आटोपून रात्री ९ वाजता जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांना त्यांची मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही.शोधून देखील मोटारसायकल न मिळाल्याने कुणीतरी अज्ञाताने मोटारसायकल चोरून नेल्याची खात्री झाल्याने अज्ञाताविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.ह. अशोक साळुंखे करत आहेत.





