
अमळनेर : विजेच्या तारांचे काम करणाऱ्या मध्यप्रदेशातील मजुरांनी ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप व पहार ने मारून गंभीर जखमी केल्याची घटना २९ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पातोंडा येथे विका सोसायटीच्या गोदामात घडली.

राजेश शामसिंग प्रजापती रा खापरखेडा ता पिपरिया जि नर्मदापुरम मध्यप्रदेश याने अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे विद्युत वाहिनी टाकण्याचे काम घेतले असून त्याचा भाऊ कैलास शामसिंग प्रजापती हा त्याच्या गावाहून व इतर ठिकाणाहून कामासाठी मजूर आणत असतो.

२९ रोजी तो बिजाधना छिंदवाडा येथून मजूर घेऊन पातोंडा येथे पोहचला. २९ रोजी कैलास मजुरांसह पातोंडा येथील विका सोसायटीच्या गोदामात झोपले होते. रात्री सलीम उर्फ संदीप धुर्वे , गोपाळ धुर्वे साहुलाल धुर्वे , पंकज सेलू उमरावसिंग , शिवम फुलसिंग यांनी कैलास ला उठवून आताच्या आता ४० हजार रुपये दे म्हणून त्याच्याशी भांडू लागले. कैलास ने त्यांना आता पैसे नाही सकाळी पैसे देतो म्हणून सांगितले असता चौघांनी कैलास ला आर्थीन्ग चा लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने कैलासच्या नाकातोंडावर , पायावर वार केले तसेच दोन्ही हात फ्रॅक्चर केले. त्यात कैलास बेशुद्ध झाला. हे पाहून आरोपी पळून गेले. ३० रोजी सकाळी सुपरवायझर तिवारी मजुरांना घ्यायला गेले असता त्यांना कैलास बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने धुळे येथे सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला इंदोर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले. राजेश याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.

