
अमळनेर:- येथील साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त जून्या साडी पासून बनवलेल्या 5000 कापडी पिशव्या भेट स्वरूपात भाजी विक्रेते यांना देण्यात आल्या.

या पर्यावरण पूरक उपक्रमासाठी चेतन सोनार, दर्शना पवार, लोकेश वाणी, प्रदिप अग्रवाल, नाना धनगर, शिव निकम, श्याम पाटील, उदय पाटील, युनियन बँक मॅनेजर चौधरी सर, शोएब, अख्तर, जावेदा, भारती महाजन, सुरेश महाजन यांचे सहकार्य लाभले. हा उपक्रम वर्षभर नियमित राबविण्यात येणार असून या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी आपल्या घरी असलेल्या जून्या साड्या दर्शना पवार यांच्या कडे जमा कराव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले.





