
अमळनेर : तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी गुंतवणूक बोर्डाची(पी आय बी) ची बैठक १२ रोजी दुपारी ३ वाजता दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आली आहे.

निम्न तापी प्रकल्प पाडळसरे चा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यासाठी पीआयबी ची मान्यता आवश्यक आहे. नुकतेच आमदार अनिल पाटील यांनी जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी केंद्रीय मंत्री पाटील यांनी लवकरच गुंतवणूक बोर्ड (पीआयबी) ची मान्यता देण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीला नीती आयोग , जलशक्ती मंत्रालय , पंचायत राज ,पर्यावरण , कृषी , कामगार , अर्थ यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान निम्न तापी प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाची मान्यता मार्च २०२५ पर्यंत देण्यात आली होती. त्यामुळे प्रकल्प पुढे सुरू राहण्यासाठी व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी सर्व मान्यता आवश्यक राहतील. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत प्रकल्पाचा समावेश झाल्यास राज्यसरकारवरचा भार कमी होणार आहे.




