
अमळनेर:- तालुक्यातील हिंगोणे बु. येथे वीज पडून गोठ्यात बांधलेली म्हैस ठार झाल्याची घटना १२ रोजी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील हिंगोणे बु. येथील शेतकरी प्रवीण मखमल पाटील यांची ७५ हजार रुपयांची गाभण असलेली म्हैस गोठ्यात बांधलेली होती. दिनांक १२ रोजी रात्री आलेल्या वादळात रात्री ९:३० वाजता वीज पडल्याने म्हशीचा मृत्यू झाला. १३ रोजी तलाठी प्रशांत पवार व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.




