
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत विविध दाखले कागदपत्रे आणि लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिता वाघ या होत्या. अभियानांतर्गत मारवड मंडळ भागातील मारवड, शहापूर, कळमसरे, प्र डांगरी, निम व करणखेडा या गावातील नागरिकांसाठी १३ रोजी जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक मुलांची शाळा, मारवड ता. अमळनेर येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात आमदार आणि खासदार यांनी नागरिकांशी संवाद साधला. सदर शिबीरात प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसिलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका कषी अधिकारी आधार संस्था, तसेच तालुका स्तरावरील सर्व कार्यालये यांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. एल जी चौधरी यांनी सुत्रसंचालन केले. प्रत्येक विभागाने स्वतः उपस्थित राहून आपआपल्या विभागाचे स्टॉल लावून मंडळ भागातील सर्व गावातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विदयार्थी व महिला यांचे शासकीय विभागांशी संबंधित तक्रारींचे अथवा समस्यांचे निराकरणकरून वंचित लाभार्थीना आमदार अनिल भाईदास पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र धनादेशाचे वाटप करण्यात आले. उक्त शिबीरात खालील कार्यालयांकडून
लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले.त्यात विविध शासकीय कार्यालयांचा समावेश होता.
१) पुरवठा शाखा – ६७ शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका
२) संजय गांधी योजना – ३ राष्ट्रीय अर्थसहाय्य धनादेश वितरित, २६५ डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, १२ नवीन लाभार्थी भरून घेण्यात आले
३) निवडणूक शाखा – १३ मतदारांकडून नमुना ६ अर्ज भरून घेण्यात आले स्थलांतरीत मतदारांकडून नमुना ८ भरून घेतला
३) सेतू शाखा कार्यालय – १७५ उत्पनाचे दाखले, २४ रहिवासी दाखले, ७५ जातीचे दाखले, २२ आधार नोंदणी, ७२ आधार दुरुस्ती,
पंचायत समिती – महात्मा गांधी रोजगार योजनेतून २५ सिंचन विहिरी प्रशासकीय मान्यता,१० गोठशेड प्रशासकीय मान्यता, ३४ जलतारा प्रशासकीय मान्यता यावेळी देण्यात आल्या.




