
डांगरी येथील योगेश शिसोदे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी निवड…
अमळनेर -तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची बैठक मा.आमदार डॉ.बी.एस पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाली.

यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक आणि पक्षवाढी संदर्भात डॉ पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डांगरी येथील युवा नेतृत्व योगेश शिसोदे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या बैठकीस ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, मनोहर निकम, कमल आक्का,अनंत निकम,अॅड शकील काझी यांनी मार्गदर्शन केले.सुरवातीला प्रास्ताविक तालुका अध्यक्ष डी.एम पाटील यांनी तर सूत्रसंचालन डी.ए. पाटील व आभार प्रदर्शन शहराध्यक्ष प्रशांत निकम यांनी केले. कार्यक्रमाला अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.




