
अमळनेर : शहरातील पैलाड भागातील ५५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना १६ रोजी दुपारी उघडकीला आली.

लालचंद नारायण येशी वय ५५ यांनी स्वतःच्या राहत्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली.
मयताचा पुतण्या कल्पेश राजेंद्र येशी याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.




