
अमळनेर: येथील रोटरी क्लब आणि आधार बहुउद्देशीय संस्था, अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट वाटपाचा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमात ३० अति गरजू एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ व एकलपालक बालकांना दर महिन्याप्रमाणे किराणा किट व प्रोटीन किट कै. वसंत माधव अमृतकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ३० प्रोटीन किट देण्यात आले सोबत प्रत्येकी सहा वह्या देण्यात आल्या आजच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी श्रीमती पुष्पा अमृतकर होत्या त्याच्या परीवारतील अमरदिप अमृतकर व त्यांच्या सुन हजर होत्या व त्यांच्या हस्ते ३० किराणा कीटचे वाटप करण्यात आले व आधार संस्थेचे कर्मचारी श्री आनंद पगारे यांच्या कडून ३० पाण्याची बाॅटल देखील देण्यात आल्या.
हा कार्यक्रम मागील 5 वर्षा पासुन सलग सुरू आहे. यात दर महिन्याला ह्या मुलांना हे किट देण्यात येत आहे.
आजच्या कार्यक्रमांचे प्रास्ताविक आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ भारती पाटील यांनी केले त्यांनी मुलांशी आरोग्य विषयक संवाद साधत दाते व रोटरी आणि आधार संस्थाने सर्व मुलांना किराणा किट उपलब्ध करून दिले त्यांनी आपल्या मनोगतातून आज इतक्या मुलांपर्यंत पोहोचल्याने मदत केल्याचे खरे समाधान मिळत आहे. मुलांना दर महिन्याला प्रोटीन किट व सकस आहार वाटणे गरजेचे असल्याने दात्यांनी या कार्यक्रमाशी जुडावे व गरजू मुलांपर्यंत आपली मोलाची मदत पोहोचवावी, असे आवाहन डॉ. भारती पाटील यांनी केले आधार संस्थेचे कार्यकारी संचालक रेणु प्रसाद व रोटरी क्लबचे अध्यक्ष ताहा बुकवाला यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व रोटरी क्लबचे श्री अभिजित भांडारकर, किशोर लुल्ला, वृषभ पारेख, देवेंद्र कोठारी, रोहित सिंघवी कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी संजय कापडे, पुनम पाटील, आनंद पगारे मोहीनी धनगर राहुल पवार भावेश मराठे यांनी प्रयत्न केले व कार्यक्रमांचे सुत्र संचालन संजय कापडे यांनी केले.

