
श्री मंगळग्रह मंदिरात जागतिक योग दिन साजरा

अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात संस्थेचे सहसचिव दिलीप बहीरम यांच्या मार्गदर्शनाने जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. शारीरिक सुदृढता आणि मानसिक शांतता यासाठी योगधारणा महत्वपूर्ण ठरते. भारतातील प्राचीन अभ्यासांपैकी एक असलेला योगाभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारला गेला आहे. याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो आहे. त्या अनुशंगाने श्री मंगळग्रह मंदिराच्या नैसर्गिक वातावरणात योग दिनी योग प्रशिक्षक आशिष चौधरी व दिलीप बहिरम यांच्याकडून सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी आ. टी. पाटील, व्हि. व्हि. कुलकर्णी, बाळा पवार यांच्यासमवेत अनेक सेवेकऱ्यांनी योगाचे धडे घेतले.

सरस्वती विद्या मंदिर, अमळनेर…

विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य, निरोगीपणा आणि सजगता वाढवण्यासाठी योग सर्वोत्तम आहे असे प्रतिपादन सरस्वती विद्या मंदिर येथे मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी योग दिवस साजरा करतांना केले. याप्रसंगी योग दिनाचे महत्त्व आणि योगाचे फायदे याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देत ताडासन ,वृक्षासन,पद्मासन, त्रिकोणासन, वज्रासन, शलभासन, भुजंगासन, पवणमुक्तासन , हलासन, सर्वांगासन, शवासन यासह प्राणायाम चे प्रात्यक्षिक मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी सहकारी ऋषिकेश महाळपूरकर यांचेसह योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. याप्रसंगी विशेष उपस्थित असलेले कामगार कल्याण मंडळाचे केंद्रप्रमुख अजय पाटील व केंद्र सेवक राकेश चौधरी यांनी योग प्रशिक्षण देणारे मुख्याध्यापक रणजित शिंदे व ऋषिकेश महाळपूरकर यांचे सह उपस्थित शिक्षक वृंद यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.योग दिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी, शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक आनंदा पाटील,सौ.संगिता पाटील, सौ.गीतांजली पाटील,सौ.शितल पाटील, उपशिक्षक धर्मा धनगर आदींनी परिश्रम घेतले.
मारवड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामाजिक संदेश…

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नीत ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड, संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा .डॉ. देवदत्त पाटील यांनी उपस्थितांना योग प्रकाराविषयी माहिती दिली. योग हे एक शास्त्र आहे. शरीर,मन आणि आत्मा एकत्रितरित्या संतुलन घडविण्याचे निरोगी आणि प्रसन्न ठेवण्याचे साधन आहे असे त्यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले आणि उपप्राचार्य प्रा. डॉ. व्हि.डि. पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, डॉ . जितेंद्र माळी,प्रा. विजयकुमार पाटील यांनी परिश्रम घेतले.
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.




