
अमळनेर : योगा दिनानिमित्त अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये देखील योग शिक्षिका प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलिसांनी योगासने केली.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव, गणेश पाटील ,विनोद सोनवणे , अमोल पाटील ,जितेंद्र निकुंभे , विनोद भोई,नरेश बडगुजर ,राहुल पाटील ,विजय भोई, सिद्धांत शिसोदे,संदीप धनगर,सुनील पाटील यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी २१ रोजी सकाळी ७ वाजता पोलीस स्टेशन आवारात योगासने केली. यावेळी पोलिसांना चपळता येण्यासाठी नियमित योगासने आवश्यक असल्याचे प्रतिभा पाटील यांनी सांगितले. तर दिवसभराच्या ताण तणावातून आंनदी राहण्यासाठी पोलिसांनी नियमित व्यायाम व योगासने केली पाहिजेत असेही आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले.




