
अमळनेर : तालुक्यातील जुनवणे रामेश्वर पळासदळे या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

जुनवणे रामेश्वर पळासदळे हा रस्ता २०१० मध्ये पंतप्रधान सडक योजनेतून झाला होता. आता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहचालकांना मणक्याचे विकार होत असून वाहनांचे देखील नुकसान होत आहे. निवडणुकीच्या आधी रस्ता मंजूर झाला ,टेंडर झाले असे सांगण्यात आले होते मात्र निवडणूक होऊन एक वर्ष उलटले तरी रस्ता होत नाही. त्याचप्रमाणे सारबेटे रामेश्वर रस्ता देखील अतिशय खराब झाला असून त्यावरून देखील वाहने जाऊ शकत नाही. तरी दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती भोजमल पाटील यांनी केली आहे.




