
अमळनेर-येथील रेल्वे स्थानकावरून एकाची दुचाकी लंपास झाल्याची घटना दिनांक 22 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक असे की शिवशक्ती चौकातील गौरव सुभाष पाटील हे रेल्वे स्टेशनवर गेले असता त्यांची काळ्या आणि सिल्वर कलरची हिरो स्प्लेन्डर कंपनीचिं मोटरसायकल क्रमांक एम एच 18,बी एस 7871 ही स्टेशन बाहेर लाऊन ते जळगाव गेले होते,जळगाव येथून दुपारी 1.30 वाजता ते रेल्वेने परतले असत त्यांची दुचाकी लंपास झाल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेको विनोद भोई हे करीत आहेत.




