
अमळनेर : तालुक्यातील जळोद येथील दिलीप उत्तम ठाकरे (चौधरी) वय ५४ याने तुळशीराम हिलाल पाटील यांच्या शेतात निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.





