
अमळनेर:- स्थानिक अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तालुक्यातील सुरू असलेला अमर्याद वाळू उपश्याला पायबंद घालावा अशी मागणी पत्रकार समाधान मैराळे यांनी केली आहे.

तालुक्यातील तापी, बोरी, पांझरा या मोठ्या नद्या तसेच अनेक उपनद्यामधून मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैधरित्या उपसा सुरू असून स्थानिक अधिकारी यावर मूग गिळून गप्प बसले आहेत. तालुक्यातील बहादरपूर रस्त्यावर हिंगोणा गावाजवळ बोरी नदीत मोठमोठे खड्डे वाळू माफियांनी करून ठेवले आहेत. अशीच परिस्थिती तालुक्यातील जळोद, सावखेडा, मांडळ , मूडी व अन्य गावात असून महसुलच्या अधिकाऱ्यांना आयता पत्ता देऊन ही कारवाई होत नसून मनाला न पटणारी कारणे अधिकारी देत असतात. स्थानिक पातळीवरील अधिकारी अज्ञात कारणाने निष्क्रीय झाले असून आता जिल्हाधिकारी या नात्याने आपण या विषयाकडे लक्ष घालावे अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते समाधान मैराळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

