
अमळनेर:- चार दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात वाळूचोरांनी पुन्हा उचल खाल्ली असून काल रात्री पुन्हा बोरी नदीतून वाळू उपसा सुरू झाला आहे.

तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू चोरीबाबत जोरदार आवाज उठवल्यानंतर गेले चार पाच दिवस वाळू वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र काल रात्री कलेक्शन मॅनेजर असलेल्यांकडून पुन्हा सुरू करण्याबाबत फोनाफोनी झाल्याने रात्री पुन्हा बोरी नदीतून वाळू चोरीला सुरुवात करण्यात आली आहे. आता या वाळू चोरांना आशीर्वाद कोणाचा आशीर्वाद आहे हे वेगळे सांगायला नको.




