
अमळनेर : आई , मामा व बहिणीसह चौघांनी एकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना २४ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास गांधलीपुरा भागात घडली.

वाशीम शरीफ शहा रा इस्लामपुरा याचा उधना सुरत येथील मामा अफसर शहा हा नेहमी वाशीम याच्या आईकडे येऊन नेहमी त्यांच्याविरोधात सांगून आपसात भांडणे लावत असे. २४ रोजी वसिम याला गांधलीपुरा भागात रियाज शेख मौलाना यांनी बोलावले. वसीम त्याठिकाणी गेला असता तेथे त्याचा मामा अफसर शहा , आई हसरतजहा शरीफ शहा, बहीण अफरोज शरीफ शहा व अनोळखी इसम आधीच उभे होते. आई ,मामा आणि बहीण नेहमीप्रमाणे वसीम आणि त्याच्या पत्नीवर आरोप करू लागल्याने तो तिथून निघत असताना मामाने कॉलर पकडून चापटांनी मारू लागला. तोच अनोळखी इसमाने तीक्ष्ण हत्याराने त्याच्या ओठावर वार केल्याने ओठ फाटला. आई बहीण यांनी देखील शिवीगाळ केली. मित्राच्या मदतीने वसीम उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला. उपचार घेऊन परत आल्यावर त्याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून मामा ,आई आणि बहिणीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.

