
अमळनेर:- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (मुंबई) मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2025 चा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून त्यात माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) कॉलेजचा ९५ टक्के निकाल लागला आहे.

माऊली पॉलिटेक्निक कॉलेजच्या तृतीय वर्षात प्रथम प्रणव कांतीलाल चौधरी (92.24%), द्वितीय भूषण रवींद्र पाटील (87.47%), तृतीय मिलिंद अशोक पाटील ( 82.21%), द्वितीय वर्षात प्रथम अनुष्का विजय देवरे (87.44% ) द्वितीय ऋषिकेश किरण पाटील (84.89% ) तृतीय चेतन पावभा धनगर (84.44%) तर प्रथम वर्षात प्रथम अथर्व प्रवीण पाटील (85.44%) द्वितीय मृदुला सुरेश खैरनार (85.41%), तृतीय आर्यन विपीन सोनवणे (83.88%) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
ग्रामीण भागात असूनही संस्थेच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी व उंच निकालाची परंपरा कायम राखण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, म. रा. तं. शि. म.चे संचालक डॉ. प्रमोद नाईक, नाशिक विभागीय कार्यालयाचे सह संचालक डॉ. गोरक्ष गर्जे तसेच छ. संभाजी नगर विभागाचे उपसचिव श्री. प्रा. देवेंद्र दंडगव्हाळ यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन वेळोवेळी लाभले. वरील सर्व विद्यार्थ्यांचे मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ.अनिल शिंदे यांनी अभिनंदन केले असून सर्व प्राध्यापक, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक संस्थेचे सचिव डॉ.संदीप जोशी व प्राचार्य कुणाल पाटील यांनी केले आहे.




