
अमळनेर येथील दिपक मेडिकलचा ही समावेश…
अमळनेर:- जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपसाठी नऊ फर्मशी करार केले असून त्यात अमळनेर येथील दीपक मेडिकलचा ही समावेश आहे.

२९ जून रोजी विद्यापीठाने मे. दिपक मेडिकलसोबत करार केला. त्यामुळे प्रत्येक वर्षी फार्मसीच्या शेवटच्या वर्षातील विद्यापीठातील विद्यार्थी, दिपक मेडिकल, अमळनेर येथे इंटर्नशिप करतील. या इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिकायला मिळेल तसेच मेडिकलमध्ये ही स्टाफ उपलब्ध होईल. विद्यापीठात सामंजस्य करार कार्यक्रमात बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्या उपस्थितीत याबाबतचे करारपत्र दीपक पाटील यांना प्रदान करण्यात आले. यावेळी ९ फर्म सोबत करार करण्यात आले,त्यात ८ करार कंपन्यांसोबत तर मेडिकलसोबत एकमेव असा करार दिपक मेडिकल यांच्या सोबत करण्यात आल्याने संचालक दीपक रामलाल पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.




