
मंगरूळ येथील शेतकरी बांधवांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर-शासनाच्या सन 2024 च्या अतिवृष्टी अनुदाना पासून वंचित शेतकऱ्यांना न्याय देऊन अतिवृष्टी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करावी याबाबतचे निवेदन मंगरूळ शेतकरी बांधवांच्या वतीने अमळनेर प्रांताधिकारीना देण्यात आले.

यात म्हटले आहे की शासनाच्या अतिवृष्टी अनुदाना पासुन बरेच शेतकरी वंचित आहेत जसे की, काही शेतकऱ्यांचे अनुदान यादीत नावेच आलेत नाही तर काही शेतकऱ्यांची (E-KYC) ई-के.वाय.सी. होऊन देखील अनुदान त्यांना प्राप्त झाले नाही व बऱ्याचश्या शेतकऱ्यांची (E-KYC) ई-के. वाय.सी. झालेली नाही, आपल्या कार्यालयाशी व तलाठी कार्यालयाशी वारंवार संपर्क साधुन देखील, सदर बाबतीत कोणतीही सुधारणा झालेली दिसुन येत नाही, तसेच (सुमारे एक महिन्या पासून) वारंवार साईड बंद (सर्वर बंद) असल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांना नेहमी उडवा उडवीची उत्तरे दिली जातात.तरी सदर बाबतीत जातीने लक्ष देवून अनुदान यादीत नावे सुटलेल्या शेतकऱ्यांना व अनुदाना पासुन वर्चित असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या स्तरावरून न्याय मिळवुन द्यावा अन्यथा या संदर्भात उपोषण किंवा मोर्चा काढुन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर मौजे मंगरूळ ता. अमळनेर येथील शेतकरी दिपक जगतराव बागुल,अशोक पुंडलिक पाटील,भाईदास नवल पाटील, आधार रामदास पाटील, निरांक सुभाष पाटील,आनंदा बापू पाटील,रवींद्र हिलाल पाटील,बापू नथु पाटील,पांडुरंग पाटील,कल्याण पाटील, किशोर पाटील,हर्षल पाटील,रमेश पाटील,संजय पाटील, अशोक पाटील,वासुदेव पाटील,अरुण घोलप,विश्वास पाटील,मनोहर पाटील व भानुदास पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.




