
अमळनेर : गांधलीपुरा भागात अमळनेर पोलिसांनी छापा टाकून देहविक्री करणाऱ्या दोन मालकीणी देहविक्री करणाऱ्या नऊ महिला आणि नऊ ग्राहकांना अटक करून पिटा कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

गांधलीपुरा भागात वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या अनेक दिवसांपासून तक्रारी होत्या. मात्र पोलीस जाण्यापूर्वी त्या पळून जात असल्याने कारवाई करण्यास अडचण येत होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गोपनीयता पाळत सुनसान जागेवर पोलीसांची बैठक घेत तेथूनच सापळा रचून खाजगी वाहनाने १ जुलै रोजी दुपारी साडे चार वाजता गांधलीपुरा भागात छापा टाकला. वेगवेगळ्या घरात व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी फरार झालेल्या महिलेच्या घरात देहविक्री करणाऱ्या दोन मालकिनी, नऊ वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला व नऊ ग्राहक यांना अटक केली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे ग्राहक म्हणून गेलेले शाहरुख शेख असलम वय ३० वर्षे, रा. खडकपुरा पाळधी ता. धरणगांव जि. जळगांव ,समाधान मांगलु पाटील वय ३२ वर्षे, रा. शिरसमणी ता. पारोळा करण कैलास भिल वय १७ वर्षे, रा. गलवाडे ता. अमळनेर ,उदय दिलीप शितोळे वय ४० वर्षे रा. भडगांव ता. भडगांव ,निखील बापु बच्छाव वय १९ वर्षे, रा. पिंप्री ता. धरणगांव ,बस्तीलाल गोविंदा पाटील वय ३३वर्षे, रा. खडके खु॥ ता. एरंडोल ,जावेद शेख सत्तार वय ४२ वर्षे, रा. गांधलीपुरा, नामदेव वामनराव बडगुजर, वय ७८ वर्षे, रा. शिवनेरी नगर, चाळीसगांव यांनाही अटक केली आहे.
डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर समाधान गायकवाड, पोहेकॉ गणेश पाटील, प्रदिप खैरनार, कैलास शिंदे, मिलींद सोनार, विनोद भोई, विनोद सोनवणे, सिध्दांत शिसोदे, मंगल भोई, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, विनोद संदाशिव, प्रशांत पाटील, नितीन कापडणे, मयुर पाटील, निलेश मोरे, राहुल पाटील, राहुल पाटील, उज्वलकुमार म्हस्के, भुषण परदेशी, राहुल चव्हाण, नरेश बडगुजर, संजय सोनवणे, वाल्मीक पाटील, गणेश पाटील, उदय बोरसे, शामल पारधी, वैष्णवी पाटील होमगार्ड निलीमा पाटील , ममता सुनिल ठाकरे , मनिषा राजेंद्र वारुळे, निलीमा ज्ञानेश्वर पाटील यांनी संयुक्तिक कारवाई केली आहे तसेच पंच म्हणून आसिफ मुसा खाटीक दिपक रमेश सिंधी, निर्मला चंद्रकांत मोरे यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांनी फिर्याद दिल्यावरून पिटा ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.
दरम्यान व्यवसाय करणाऱ्या ९ महिलांना महिला सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. तर तिन्ही महिलांची घरे सील करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले.




