
अमळनेर : भरधाव जाणाऱ्या एस टी ने डपंर ला मागाहून धडक दिल्याने बसचालक व एक प्रवासी जखमी झाल्याची घटना ३ रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास अमळनेर धुळे रस्त्यावर घडली.

गोरख भगवान पाटील हा डपंर क्रमांक एम एच ५४ ,३५९ डिझेल भरण्यासाठी धुळे रोडला जात असताना त्याने आर के नगर जवळ गतिरोधक आल्याने वाहन हळू केले. त्याचवेळी अमळनेर पुणे बस क्रमांक एम एच १४ एम एच २६८७ ने डपंर ला मागाहून धडक दिली. धडक जोरात बसल्याने एस टी चालकाचे पाय केबिन मध्ये अडकले. तर एका प्रवाश्याच्या डोक्याला मार लागला. आजूबाजूला लोकांची गर्दी होती. लोकांनी सुमारे पाऊण तासानंतर चालकाचे पाय बाहेर काढले. १०८ रुग्णवाहिकेने त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.
गोरख भगवान पाटील याने अमळनेर पोलिसस्टेशनला फिर्याद दिल्यावरून बस चालक मनोहर दत्तात्रय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान ही बस नवी असून याची मला सवय नसल्याने मला नवी बस देऊ नका असे चालक मनोहर पाटील यांनी सांगितले होते. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. चालक उशिरा आगारात आले त्यामुळे बसला देखील उशिर झाला.
दरम्यान अमळनेर आगाराला नुकत्याच पाच नवीन बसेस प्राप्त झाल्या असून त्यातील दोन बसेसचा अपघात झाला आहे. चालकांना नवीन बसची सवय नसल्याने त्यांनी नवीन बस न्यायला नकार दिला होता. याबाबत आगार प्रमुखांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी भ्रमणध्वनी लावला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.




