
अमळनेर : येथील शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख श्रीकांत पाटील यांच्यासह तालुक्यातील मंगरूळ येथील सरपंच, उपसरपंच व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर , युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे जळगावहून नंदुरबार जातांना अमळनेरला पक्षाच्या कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या तसेच आमदार अनिल पाटील , जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रमुख श्रीकांत पाटील , मंगरूळचे सरपंच समाधान पारधी , उपसरपंच श्रुती पाटील , काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तुषार बोरसे , आरीफ तेली यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.
यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर ,माजी खासदार तथा मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे , माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील , बाजार समिती सभापती अशोक पाटील , सामाजिक न्याय शाखेचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे , विदयार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम , युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे , उमेश नेमाडे , युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे , तिलोत्तमा पाटील ,रिटा बाविस्कर , जयश्री पाटील , तालुकाध्यक्ष भागवत पाटील , शहराध्यक्ष मुख्तार खाटीक हजर होते.
स्वागत व प्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नंदुरबार कडे रवाना झाले होते.

