
अमळनेर:- तालुक्यातील मारवड रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळ दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना २९ रोजी रात्री घडली आहे.

कळमसरे येथील रहिवासी संतोष ओंकार माळी (वय ४८) हे २९ रोजी रात्री ८ वाजता अमळनेर येथून दुचाकीने परतत असताना धानोरा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच १४ एचयू 8411 वरील चालकाने भरधाव वेगाने ठोस दिल्याने संतोष माळी हे जखमी खाली पडले. जमलेल्या लोकांनी त्यांना उचलून सरकारी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना धुळे येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून उजव्या हाताच्या पंजा आणि बोटांना दुखापत झाली असून दुचाकीचे नुकसान झाल्याने ट्रक चालकाविरुद्ध मारवड पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून पुढील तपास हेकॉ प्रवीण पारधी हे करीत आहेत.




