
अमळनेर-येथील शिवशक्ती कॉलनी परिसरात रस्त्यांची दुरावस्था झाल्याने याची त्वरित दुरुस्ती करून मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा या मागणीचे निवेदन पालिकेच्या मुख्याधिकारीना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की पालिकेने वाढीव घरपट्टी लावली परंतु त्या बदल्यात नागरिकांना पुरेशा सुविधा आपण देत आहात का ? हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. ना धड चालायला रस्ते आहेत, ना स्वछता, गटारी वर्षभरापासून साफ केल्या नाहीत, कचरा गाडी नियमित नाही.परिसरात मोकाट गुरांचा त्रास एवढा वाढला आहे की लोकांना पायी चालणे मुश्किल झाले आहे. परिसरात एकही रस्ता असा नाही जो ठेकेदारांनी खोदून ठेवलेला नसेल, पूर्ण उन्हाळा यांनी कामे केली नाही आणि ऐन पावसाळ्यात त्यांचे खंदकाम सुरू आहे, गटारी पूर्णपणे तुंबलेल्या आहेत, त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे लोक आजारी पडत आहेत,घंटा गाडी गाडी मालकाच्या मर्जी नुसार येते. पिण्याचे पाणी वेळेवर नसते तरी या सर्व अडचणींचा निपटारा आपण आपल्या स्तरावरून करावा अशी विनंती यात करण्यात आली आहे.अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.सदर निवेदनावर उत्कर्ष पवार,विकास चौधरी,पराग चौधरी,भुषण जोशी,श्री पावरा,अनिल पाटील,किरण पाटील,हर्षल पाटील,बबन चौधरी,सुखदेव पाटील,प्रकाश चौधरी,ब्रिजलाल पाटील,प्रल्हाद पाटील,रवी पाटील यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




