
अमळनेर: धुळे येथे झालेल्या नॅशनल प्रोॲक्टिव अबॅकस् परीक्षेमध्ये अमळनेर येथील गार्गी प्रोअँक्टिव अबॅकस् येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मिळवले आहे.

या परिक्षेत धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यातील एकूण, एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात अमळनेर येथील 50 विद्यार्थ्यांपैकी 21 विद्यार्थी रँक मध्ये आले आहेत. तसेच गार्गी प्रोअँक्टिव अबॅकस् च्या संचालिका सौ .भावना दिपक पाटील यांना बेस्ट सेंटर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. भावना दिपक पाटील ह्या
दिपक मेडिकल चे संचालक, दिपक रामलाल पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




