
अमळनेर :- येथील श्री स्वामी समर्थ आधात्मिक केंद्रात काल गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करण्यासाठी मोठ्या संख्येने सेवेकरी उपस्थित होते.
दर्शनासाठी यावेळी महिला व पुरुष भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री स्वामी समर्थ आधात्मिक केंद्रात गुरुपौर्णिमेच्यानिमित्ताने जिवन श्री ब्लड बँक, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.यावेळी पुरुष व महिला सेवेकऱ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून गुरुचरणी सेवा अर्पित केली.दिवसभरात सेवा केंद्रात सुमारे सहा हजार भाविकांनी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला.




