
अमळनेर :- तालुक्यातील लोणखुर्द येथे रविवार दि. १३ जुलै रोजी समृद्ध पंचायतराज सक्षमीकरण अभियानांतर्गत “एक पेड माॅ के नाम” उपक्रमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, सरपंच प्रा. डाॅ. शशी पाटील, ग्रा. सदस्य ललिता पाटील, सुमनताई भील, अंगणवाडी ताई , ग्रामसेवक विजय पाटील, ग्रा. पं. शिपाई भिकन पाटील, संगणक परीचालक अशोक पाटील, आशाताई, कृषीताई, तांत्रिक सहाय्यक, रोजगार सेवक, समाधान शिंदे, बाळासाहेब पाटील, कैलास पाटील, धर्मा पाटील, विनायक पाटील, बाळू मोरे, देवचंद भिल, भाऊसाहेब भिल, सचिन शिंदे, योगेश साळुंखे, निखिल साळुंखे आणि इतर तरूण व तरूणी मोठया संख्येने उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या या ग्राम समृद्ध अभियानात लोणखुर्द ग्रामपंचायतीने सहभाग घेतला असून येत्या काळात ग्रामपंचायतीस आयएसओ नामाकंन मिळवुन देण्यासाठी तत्पर असल्याचे मत लोणखुर्द गावाचे सरपंच प्रा. डॉ. शशी पाटील यांनी स्पष्ट केले तर संत तुकोबारायांनी सांगितलेल्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे-वनचरे या उक्तीनुसार झाडेच आपली खऱ्या अर्थाने सगेसोयरे असून ग्लोबल वॉर्मिंग, हवा व मृदा प्रदुषण, दिवसागणिक शेती उत्पादनात होत असलेली घट, अनियमित पावसाळा, अवकाळी पाऊस या सर्वांवर उपाय म्हणून वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज असुन गावातील प्रत्येक नागरिकाने झाड लावून त्याचे संवर्धन केल्यास निश्चितच पर्यावरणाच्या होणाऱ्या र्हासास रोखता येईल असे मत बाजार समितीचे सभापती मा. अशोक पाटील यांनी व्यक्त केले. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत रस्त्याच्या कडेला, अंगणवाडी व ग्रामपंचायत परीसर, गावठाण, स्मशानभूमी, व्यायामशाळा परीसर, गावतळे बांध्यावर तसेच आदिवासी वस्ती परीसरात वड, पिंपळ, कडूनिंब, चिंच, सुबाभूळ, गुलमोहर, कदंबा, अशोकवृक्ष, शिसम, आफटा, बांबू अशी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. वृक्षारोपण झाल्यावर सर्व ग्रामस्थांनी वृक्षसंवर्धनाबाबत शपथ देण्यात आली. शपथकथन तांत्रिक सहाय्यक हिमानी पाटील यांनी केले. सुत्रसंचालन अशोक पाटील यांनी तर आभार कृषीताई अर्चना पाटील यांनी मांडलेत.




