
दोन सदस्य संख्येत वाढ,36 नगरसेवकाना मिळणार संधी
अमळनेर-विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन,नाशिक यांचेकडून अमळनेर नगर परिषद प्रभाग संख्या आरक्षण जाहीर झाले असून यानुसार निवडणुकीसाठी 18 प्रभाग जाहीर करण्यात आले आहेत
गेल्या निवडणुकीत 17 प्रभाग व 34 सदस्य संख्या असताना यंदा दोन सदस्य संख्येत वाढ होऊन एक प्रभाग वाढल्याने एकूण 36 नगरसेवकांना पालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
असे असेल आरक्षण
सदर निवडणुकीत 36 पैकी 50 टक्के म्हणजे 18 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.यातून अनुजाती,अनु जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण निघून जागा सर्वसाधारण असणार आहेत.तसेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अद्याप प्रलंबित आहे.प्रभाग रचनेचे कामकाज सुरू असून रचना कशी असेल याचा खुलासा लवकरच होणार आहे. एकंदरीत पालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्याने इच्छुक देखील सक्रिय झाले आहेत.




