
अमळनेर : तालुका व पारोळा तालुका हद्दला लागून असलेल्या जंगलात एकानेच दोन खून आणि एक खुनाचा प्रयत्न केल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी अधिक माहिती व तपासासाठी पोलीस पाटील , ग्रामस्थ व आपल्या कर्मचाऱ्यांसह ३० जणांचा ताफा घेऊन जंगलात शोध मोहीम राबवली.
सुमठाणे येथील अनिल गोविंदा संदानशीव याने फरकांडे येथील मूळ रहिवासी व हल्ली सुरत येथे राहणाऱ्या वैजंती भगवान भोई वय ४८ या महिलेला ४ मे रोजी सुरत येथून बोलावून ५ रोजी पहाटे चार साडे चार वाजता त्याने जानवे सुमठाणे शिवारात बोलावून तिचा खून केला.
त्याचप्रमाणे २६ जून रोजी त्याने उंदिरखेडा येथील शोभाबाई कोळी याना पारोळा येथून बोलावून तिचा सुमठाणे शिवारात दगडाने ठेचून खून केला. २८ जून रोजी अमळनेर पोलिसांना ही घटना उघडकीस आली. त्या दरम्यान अनिल ने अमळनेर येथील शहनाजबी हिला याच जंगलात डांगर शिवारात बोलावून तिच्यावर देखील खुनी हल्ला केला. मात्र तिने आरडाओरडा केल्या नंतर काही शेतात काम करणारे लोक आले आणि त्यांच्यामुळे तिचे प्राण वाचले. अनिल मात्र पळून गेला होता. त्यांनतर नुकतेच वैजंती भोई खून प्रकरण उघडकीस आले आणि पोलीस हादरले. वैजंता आणि अनिल २ रोजी बसने सुरतेहून सोबत आले. पारोळा आल्यानंतर दोघांची मोबाईलनंबर देवाणघेवाण झाली. नंतर त्याने महिलेला ५ रोजी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास धुळ्याहून घेतले होते आणि एक दोन तासात जंगलात तिला संपवले होते.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी या प्रकरणाच्या खोलात जाण्याचे ठरवले. आरोपी अनिल याच्या वर्तणूकीची सखोल माहिती घेतली असता तो सिरीयल किलर असावा. त्याने अजून काही खून केले असावेत , त्याच्या सोबत आणखी काही गुन्हेगार असावेत म्हणून त्यांनी स्वतः पोलीस निरीक्षक युवराज बागुल आणि शोध पथक कर्मचारी , गुन्हे शोध कर्मचारी असे १८ जण तसेच जानवे पोलिस पाटील विलास पाटील , मंगरूळचे भागवत पाटील , कोंढावळचे योगेश पाटील , इंदापिंप्रीचे प्रवीण सोनवणे , लोंढाव्याचे प्रभाकर पाटील ,सारबेटेचे येथील नंदू राठोड , एकरुखीचे येथील रवींद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ अशा ३० जणांनी भर पावसात तीन तास सर्च ऑपरेशन राबवले. जंगलात काही अवशेष अथवा काही वस्तू पुरावे म्हणून सापडतात का ? याबाबत शोध घेण्यात आला. अनिलने आणखी काही खून केले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.




