
बाजार समिती सभापती अशोक पाटील व संचालक मंडळाचा स्तुत्य उपक्रम…
अमळनेर :- तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती, संचालक मंडळाने तालुक्यातील सुमारे साडे तीन हजार शेतकऱ्यांना बैल पोळा साज भेट देत पोळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना अनोखी भेट देत तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात हा स्तुत्य उपक्रम राबविल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी आमदार व माजी मंत्री अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातील बळीराजा यांना बैल पोळा साजरा करण्यासाठी सहकार्य करण्याचे सांगितले असता बैल पोळ्याला लागणारे साज साहित्य शेतकरी बांधवांना प्रत्येक गावी जातं भेट देण्यात आले.
बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी बाजार समितीचा पदभार स्विकारला त्यावेळी बाजार समितीवर जवळपास तीन कोटी रुपये कर्ज होते. ते परत फेड करीत आज जवळपास पाच कोटी रुपये अर्थसंकल्पीय शिल्लक आहे. यापुढेही शेतकऱ्यांसाठी विविध योजनांमधून लाभ दिला जाईल. तसेच मारवड येथील बाजार उपसमिती लवकरच सुरू करण्याचा मानस असून थोड्याच दिवसात उपसमिती आवाराच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात येणार आहे.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, उपसभापती सुरेश पाटील, संचालक प्रफुल्ल पवार, पुष्पा विजय पाटील, समाधान धनगर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, विजू आप्पा,आदी मान्यवर उपस्थित होते. मारवड येथे उमाकांत भाऊसाहेब, ग्रामपंचायत पदाधिकारी, विकासो पदाधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी नितीन सोनवणे, बाबा सुर्वे, राकेश पाटील, गुलाबराव पाटील (गोवर्धन), यांच्यासह शेतकरी वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप चौधरी सर यांनी केले. कळमसरे येथे शेतकरी जगदीश निकम, सुनील पाटील, प्रकाश पाटील, बाबुलाल पाटील, अशोक चौधरी, पिंटू राजपूत,दिपचंद छाजेड, भालचंद्र चौधरी, जगन चौधरी, काशिनाथ भिल,भैय्या बडगुजर, कौतिक महाजन, दिनकर चव्हाण, प्रमिलाबाई चौधरी, आबा महाजन, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, सचिव सुधाकर पाटील यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरसे सर तर आभार प्रदीप महाजन यांनी मानले.

