
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे येथील बालिका स्नेही पंचायत सदस्यांकडून अंगणवाडीतील बालकांना व गर्भवती महिलांना पौष्टिक खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्यातील बालविकास अधिकारी प्रेमलता पाटील व पर्यवेक्षिका सुजाता मॅडम हे होते मान्यवरांचे स्वागत बालिका स्नेही पंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांनी केले यानंतर बालविकास अधिकारी पाटील यांनी विद्यार्थ्यांना व गावातील महिलांना व गर्भवती महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा युवराज पाटील उपसरपंच मिनाबाई सतीश पाटील सदस्य संतोष चौधरी पुरुषोत्तम चौधरी सुदाम पाटील आधार पाटील गुलाबराव पाटील व सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील अंगणवाडी सेविका लताताई चौधरी निर्मलाबाई चौधरी व मदतनीस यांच्या सहकार्याने बालकांना व गर्भवती महिलांना केळी, खजूर, राजगिरीचे लाडू शेंगदाण्याची चिक्की, तिळाचे लाडूचे यावेळी वाटप करण्यात आले.




