
अमळनेर:- तालुक्यातील फाफोरे बुद्रुक येथे महसुलच्या पथकाकडून अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून कारवाई करण्यात आली.
काल रात्री फाफोरे येथील बोरी नदीतून अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले असून पुढील कारवाई साठी तहसील कार्यालयात लावण्यात आले. पथकात तहसीलदार रुपेश सुराणा, गौरव शिरसाठ मंडळ अधिकारी टाकरखेडे, अभिमान जाधव ग्राम महसूल अधिकारी कन्हेरे यांचा समावेश होता.




