
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ या गावी 650 गाय आणि मुडी आणि बोदर्डे या गावात 350 जनावरांना लंम्पि लसीकरण करण्यात आले.
जळगाव जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ, प्रदीप झोड यांच्या मार्गदर्शनाखाली, भुसावळ येथील फिरते पशुवैद्यकीय पथक डॉ. पवन सरोदे, डॉ, प्रशांत कोळं चालक फकीरा तडवी, अमळनेर येथील डॉ.दीपक पाटील यांच्या सहकार्याने पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. संदेश वाटोळे, यशोदीप पाटील, बोरसे यांच्या सहकाऱ्याने तिन्ही गावात संपूर्ण लंम्पि आजाराचे लसीकरण करण्यात आले आणि बाधित जनावरांना उपचार देखील करण्यात आले, यावेळी मांडळ गावाचे दीपक बडगुजर , माजी सरपंच विजय पाटील, माजी सरपंच नथू पाटील, अनिल जैन, विनायक बडगुजर, आर डी कोळी राजेंद्र धनगर, रवींद्र मोरे, मुडी गावाचे महेंद्र भावराव पाटील, संजय पाटील, भाऊसाहेब सोनवणे, पंढरीनाथ पाटील, हेमंत पाटील, संजय पाटील, किशोर पाटील, राजेंद्र वानखेडे, काशिनाथ माळी , तुषार सूर्यवंशी, गुलाब भाऊराव पाटील, डॉ, मनोहर चित्ते, डॉ, भटू संदानशिव, डॉ, भूषण जोशी यांनी लंपी लसीकरण वेळी सहकार्य केले.




