
अमळनेर : बाहेर खेळायला जाते असे सांगून ताडेपुरा येथील एक १४ वर्षांची तरुणी बेपत्ता झाल्याची घटना २८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.
ताडेपुरा येथील जय मातादी नगरात राहणारी १४ वर्षे २८ दिवसांचे वय असणारी मुलगी सायंकाळी आपल्या आईवडिलांना मी बाहेर खेळायला जाते असे सांगून निघून गेली. रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नाही म्हणून शोधाशोध केली. मुलगी आढळून आली नाही म्हणून तिला कोणीतरी पळवल्याचा संशय आला. मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.




